खा.बजरंग सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिव्यांगासाठी पूर्व तपासणी नोंदणी शिबिर संपन्न
शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद ९०० नागरीकांनी घेतला सहभाग

आष्टी /प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या संकल्पनेतून येडेश्वरी फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, दिव्यांग सेल बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर शुक्रवार दि. २५ जुलै २०२५ रोजी घेण्यात आले. नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०० दिव्यांग व जेष्ठ नागरीकांनी सहभाग नोंदवला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब भाई शेख, ज्येष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजीराव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक बीड जिल्हाध्यक्ष सतिष आबा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष विजय अण्णा गाढवे, रिजवान भाई शेख, भुसारी साहेब केज, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने, मा. शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, समाजसेवक अशोक अण्णा पोकळे, डॉ. संतोष जाधव, आरोग्य दूत रामेश्वर गवळी, शिरिष थोरवे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड सर, संदीप जगदाळे, सोनू तळेकर, सुरेश पवार, राजकुमार थेटे, रामचंद्र खिळे आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना महेबूब भाई शेख म्हणाले की, खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी एक चांगला व स्तुत्य उपक्रम राबवला असून हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी लाखमोलाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत म्हणाले की, खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी हा उपक्रम योग्य व सुनियोजित राबवला आहे. तसेच हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे या शिबिराचा दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी म्हणाले की, यापुढेही अशा शिबिरांची आवश्यकता आहे. परंतु गाव खेड्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी संबंधित दिव्यांग बांधवांना कॅम्प बद्दल माहिती देऊन इथपर्यंत आणण्याची जबाबदारी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तर गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने म्हणाले की, पाच टक्के दिव्यांगांचा निधी लवकरच वाटप करू व भविष्यात दिव्यांग बांधवांना कॅम्प बद्दल पूर्वकल्पना देऊन माहिती देण्यासाठी ग्रामसेवक यांना सुचित करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. डॉ. संतोष काकडे म्हणाले की, खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिव्यांग सेलच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला असून पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युवा नेते महादेव डोके यांनी केले व दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांनी आभार मानले.



