सामाजिक

जिया शेख यांच्या वतीने पी.के.अण्णा पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

नेकनूर/प्रतिनिधी

­नेकनुर येथील पी.के. अण्णा पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप,तसेच वृक्ष लागवड करण्यात आली.वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शिक्षक,विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती बघण्यास मिळाली.कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी व तयारी सर्व शिक्षक गण तसेच वर्ग 1 ते 10 वी च्या विद्यार्थी यांनी पार पाडली.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपल्या हाताने एका झाडाचे रोपण केले.तसेच

यानंतर विद्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणा तील झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे,यावर भाषण दिले त्यांनी भाषणातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला. तसेच विद्यालयाचे जिया सर यांनी सुद्धा झाडाचे महत्व यावर भाषण दिले आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच,प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती आपल्या भाषणात केली.या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सालगुडे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर हे होते तसेच प्रमुख पाहुणे,भोसले सर, काळे सर ,जगताप सर , करंडे सर,मोरे सर,मिरगे मॅडम,खोसे मॅडम, विश्वास शिंदे हेउपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पायाळ मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन काळे सर यांनी मानले.प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचा छान आयोजन पंकजाताई मुंडे यांचे कट्टरसमर्थक जियाभाई शेख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!