लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त टाकळी गावात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
प्रत्येक घरी एक फळझाड वाटप करून भाजपा युवा नेते सुरज भैय्या घुले यांचा स्तुत्य उपक्रम

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या ना.पंकजाताई गोपीनाथ राव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी ता.केज येथे सामाजिक उपक्रम म्हणून भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रत्येक घरी एक फळझाड या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम भाजपा युवा नेते सुरज भैय्या घुले यांच्या वतीने राबविण्यात आला.
पर्यावरण पूरक उपक्रमात गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारची फळझाडे लावली.मंत्री पंकजाताई मुंडे या पर्यावरण खात्याच्या मंत्री असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण झाला.कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,इन्फन्ट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे,रामकृष्ण काका घुले,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावातील विविध मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला.त्यामध्ये विष्णू राख,राम घुले,प्रकाश बारगजे,रघुनाथ दादा बारगजे, अशोक घुले, रामेश्वर घुले,सोमनाथ घुले, नवनाथ घुले, उत्तरेश्वर बारगजे,परमेश्वर घुले,टी.पी.घुले,विठ्ठल बारगजे सर,व्यंकट आप्पा बारगजे, जीवन बारगजे,अंगद घुले,आदित्य बारगजे,श्रीकृष्ण बारगजे, व्यंकट घुले यांचा समावेश होता.
यापूर्वीही सुरज भैय्या घुले यांनी टाकळी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पुन्हा एकदा पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करत उदाहरण ठेवले आहे.



