शैक्षणिक

स्व.विश्वंभर काका कोकिळ यांच्या आठव्या पुण्यस्मरणार्थ मराठवाडा पातळीवरील भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

लहान गटातून आदर्श प्राथमिक विद्यालय घाटनांदुर शाळेचा अर्णव सारडा तर मोठ्या गटातून स्वामी विवेकानंद शाळेचा हरी चौरे यांनी सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ ,केज तसेच कोकिळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे संस्थापकसचिव स्व.विश्वंभर काका कोकिळ यांच्या ८ व्या पुण्यस्मरणार्थ मराठवाडा पातळीवरील भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदीर [माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये दि.२० ऑगस्ट २०२५ वार बुधवार रोजी पार पडली.या स्पर्धेमध्ये लहान गटातून आदर्श प्राथमिक विद्यालय घाटनांदुर या शाळेचा विद्यार्थी अर्णव दत्तप्रसाद सारडा तर मोठ्या गटातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय केज शाळेचा विद्यार्थी हरी रामप्रसाद चौरे यांनी सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जी.बी. गदळे सचिव,जीवन विकास शिक्षण मंडळ केज तर बक्षीस वितरण समारंभ सत्राचे अध्यक्ष म्हणून अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष,जीवन विकास शिक्षण मंडळ केज,तसेच प्रमुखपाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर प्राचार्य, भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज व इतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संस्थेचे सहसचिव तथा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे मु.अ. उपेंद्र कोकिळ,सेवा निवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे शाळेच्यामुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्यासुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,पाहुण्यांचा परिचय मेघशाम मंगरूळकर यांनी दिला. याप्रसंगी ते म्हणाले की, विश्वंभर कोकिळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे एक जबाबदार स्वयंसेवक म्हणून कार्य केले.शिक्षण क्षेत्रापासून वंचित राहणाऱ्या समाजातील पारधी मुलांसाठी वस्तीगृहे उभी केली.स्थानिक वाचनालयाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी जिल्हा ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून देखील जबाबदारी पार पाडली.

केज शहर व आसपास च्या परिसरात सर्वोत्कृष्ट शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १९८४ साली जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेची स्थापना केली.इ.स. २००० पासून उत्कृष्ट वक्त्यांचे विचार समाजात रुजविण्या साठी व्याख्यानमालेची सुरुवात केली. सांस्कृतिक क्षेत्रात देखील योगासन वर्ग, शिवप्रतिष्ठान मार्फत दुर्गादौड,छत्रपती संभाजीराजे बलिदान मास,गणेश मंदीराची निर्मिती,तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करून आरोग्या विषयी ची जागरुकता दाखवली.याप्रसंगी सेवानिवृत्त सहशिक्षक हनुमंत घाडगे यांनी आपले विचार व्यक्त केले.ते म्हणाले,’वृक्ष लाऊनिया निघुनी जाती’ या उक्ती प्रमाणे कार्य करणारे व जीवन जगणारे स्व.विश्वंभर काका होते.

त्यांनी स्थापन केलेल्या ‘जीवन विकास शिक्षण मंडळ’ या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.ते एक रत्नपारखी व्यक्तीमत्त्व होते व उपक्रमशीलता हा त्यांचा स्वभाव वैशिष्ट्यां पैकी एक गुण होता. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यशमिळवून नाव कमवावे असा त्यांचा विचार होता व या विचारातूनच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य हनुमंत सौदागर म्हणाले की, सदरील वक्तृत्व स्पर्धे साठी निवडलेल्या ‘मरावे परी किर्तीरूपी ऊरावे आणि सामाजिक समतेविषयी माझी भूमिका या दिलेल्या विषयांची याप्रसंगी त्यांनी व्यापकता स्पष्ट केली.

लहान वर्गाच्या विषयाब‌द्दल बोलताना ते म्हणाले. “तुका म्हणे एका उत्तमची सरे । उत्तमची उरे किर्ती मागे । या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे स्व. विश्वंभर काकांचे जीवन होते.हा विषय निवडून आपल्याला त्यांच्या जीवनाच्या उत्कृष्टतेची आठवण होते.मोठ्या वर्गाचा विषय म्हणजेच ‘सामाजिक समतेविषयी माझी भूमिका’ हाकेवळ बोलण्याचा विषय नसून तो विद्यार्थ्यांनीप्रत्यक्षात आचरणात आणव्याचा आहे.अध्यक्षीय समारोपात जी.बी.गदळे म्हणाले की,विश्वंभर काका हे केवळ संस्थापकच नव्हे तर आधारस्तंभही होते, आजही विश्वंभर काकांच्या शिस्तीने चालणाऱ्या शाळेसाठी विना-अपेक्षेने कार्य करणारे शिक्षक व त्यांचा त्याग ही कारणे आहेत.अशा होऊन गेलेल्या महान व्यक्तीमत्त्वांच्याकार्याची जाणीव होण्यासाठी असे उपक्रम राबवले जातात.

ही स्पर्धा ५ वी ते ७ वी तसेच ८ वी ते १० वी या दोन गटात पार पडली.या स्पर्धेमध्ये एकूण चोवीस शाळांनी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी लहान गटासाठी परीक्षक म्हणून प्रा.बाबासाहेब हिरवे वसंत महा विद्यालय केज, बाबासाहेब शिनगारे माजी मुख्याध्यापक जयभवानी विद्यालय लोखंडीसावरगाव, सेवानिवृत्त प्राचार्य अभिमन्यू पुजदेकर युसुफ वडगाव माध्यमिक विद्यालय युसुफवडगाव,यांनी काम पाहिले. तर मोठ्या गटासाठी प्रा. डॉ.हनुमंत सौदागर प्राचार्य भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज, हनुमंत घाडगे सेवा निवृत्त शिक्षक,जनार्दन सोनवणे माजी सैनिक यांनी काम पाहिले.

पहिला गट इयत्ता ५ वी ते ७ वी- वक्तृत्व स्पर्धेचा विषय “मरावे परी कीर्तीरूपी उरावे ” या स्पर्धेमध्ये लहान गटातून आदर्शप्राथमिक विद्यालय घाटनांदुर या शाळेचा विद्यार्थी अर्णव दत्तप्रसाद सारडा याने सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय- यशश्री महादेव नेहरकर जि.प. पिसेगाव,तृतीय- स्वस्तीका दिनकर राऊत युसूफवडगांव मा.व उच्च मा.वि. युसूफवडगाव, उत्तेजनार्थ- आर्या राजेंद्र लटपटे स्वामीविवेकानंद विद्यामंदिर [ मा.वि. ] केज.

दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी वक्तृत्वस्पर्धेचा विषय ” सामाजिक समतेसाठी माझी भूमिका “या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ मा. वि. ] या शाळेचा विद्यार्थी हरी रामप्रसाद चौरे याने सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला.द्वितीय- सोफिया पाशा सय्यद नूतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह, तृतीय- श्रावणी अनंत फावडे जनता माध्यमिक विद्यालय धारूर,उत्तेजनार्थ- सृष्टी तुकाराम खरटमोल जोधा प्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय आंबेजोगाई इत्यादी.

तसेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी आंबेजोगाई शिक्षक रामेश्वर माले,तसेच अभिमन्यू पूजदेकर, जनार्दन सोनवणे, प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर,बाबासाहेब शिनगारे या परीक्षकांनी स्पर्धेच्या शिस्त,परिश्रम व आयोजनाचे कौतुक केले.तसेच केज सारख्या शाळेमध्ये दर्जेदार विद्यार्थी घडतातच कसे हे प्रत्यक्ष आज अनुभवले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे यांनी अध्यक्षपद भूषविले.याप्रसंगी ते म्हणाले की,या संस्थेचे संस्थापक सचिव विश्वंभर कोकिळ यांनी कधीही स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.तर आभार शाळेच्यामुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!