शैक्षणिकसामाजिक

दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] केज या शाळे मध्ये दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त दि.१२ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी एकूण ४२ रक्त दात्यांनी रक्तदान करून रक्तदान चळवळीवरील आपले प्रेम व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उप जिल्हा रुग्णालय केज श्रीकृष्ण नागरगोजे उपस्थित होते.इतर मान्यवर उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव जी.बी. गदळे,मा.वि.चे मु.अ. शिवनंदा मुळे,प्रा.वि.चे मु. अ.वसंत शितोळे,स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल चे मु.अ.गणेश कोकीळ, प्राचार्य शंकर भैरट, सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे आदी उपस्थित होते.सदरील रक्तदान शिबिर हे मागील ३० वर्षापासून या शाळेमध्ये आयोजित केले जाते.

यावर्षी सदरील शिबिराने ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे.मागील ७ वर्षापासून हे शासकीय शिबिर सुरू आहे.या शिबिराचा सर्वसामान्य याचकाला उपयोग होतो. रक्तदानाबद्दल रक्तदात्या मध्ये बरेच गैरसमज असतात परंतु रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. वयाच्या १८ ते ५५ वर्षा पर्यंत आपण रक्तदान करू शकतो,रक्तदान केल्याने बरेच आजार कमी होतात,रोगप्रतिकार शक्ती वाढते,वजन कमी होते तसेच ७२ तासांमध्ये दिलेले रक्त पुन्हा परत येते.दर ६ महिन्याला रक्तदान केले पाहिजे जेणेकरून याचकाचे प्राण वाचतील.

या प्रसंगी माजी विद्यार्थी डॉ.अशोक डोईफोडे,सहशिक्षक महादेव गिरी तसेच कैलास अंधारे हे या शिबिराचे पहिले रक्तदाते ठरले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपजिल्हा रुग्णालय केज व जिल्हा रुग्णालय बीड तसेच सतीश गायकवाड लॅब असिस्टंट, विनोद रावताडे लॅब टेक्निशियन तर युवराज बाबरे,हेमंत बेलदार,वैभव टाकळे यांनी ब्रदर्स म्हणून विशेष परिश्रम घेतले.

तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा मास्टरस्ट्रोक कॉम्पिटिशन च्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. यामध्ये सातवी ते दहावी गटातून कु.वेदिका सिद्धेश्वर घुले ७ वी, अनुष्का बाळासाहेब अहंकारे ७ वी,यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वरील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील चित्रकला शिक्षक दादासाहेब गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!