सामाजिक

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त केज येथील शिक्षक कॉलनीत चौकाची स्थापना 

केज/प्रतिनिधी

आज दिनांक १२ डिसेंबर २०२५, शुक्रवार रोजी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त केज येथील शिक्षक कॉलनी,बीड रोड केज येथे विशेष उत्साहाचे वातावरण होते.लोकनेते मुंडे साहेब यांच्या कार्याचे स्मरण करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि याच निमित्ताने शिक्षक कॉलनीत बीड रोडला त्यांच्या नावाने एका चौकाची स्थापन करण्यात आली.

यावेळी ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब चौक’ शिक्षक कॉलनी केज असे नामकरण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.या महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्थानिक युवकांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

पत्रकार प्रकाश मुंडे,चंदू चौरे, अमोल ठोंबरे,हनुमंतराव चौरे,गोटू भैय्या पाळवदे, अमोल मुंडे,योगेश हांगे, सोनू वैभव धस,अमोल धस,रोहित मुंडे,अमोल घुले,गणेश ढाकणे,सचिन मुंडे,प्रविण थोरात आणि राजा राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला. शिक्षक कॉलनीतील या चौकामुळे स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या स्मृतीला कायम उजाळा मिळेल, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!