आदर्श विद्यालय बनसारोळा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त भिंतीपत्रकाचे अनावरण

केज / प्रतिनिधी
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बनसारोळा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या योगदानाचा सन्मान करत विविध उपक्रम सादर केले.
या कार्यक्रमात भिंतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. विशेषतः वर्ग दहावी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्यावर स्फूर्तिदायक लेख लिहून आपली अभिव्यक्ती व्यक्त केली.यामध्ये प्रथम क्रमांक कु. आक्षरा अमोल गोरे (151 रुपये) द्वितीय क्रमांक कु.स्नेहा बिभीषण पौळ (101रुपये) तृतीय क्रमांक चि. जयेश शंकर पाईकराव (71रुपये) वरील प्रमाणे नंबर कडून त्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये लहान गट 5वी ते 7वी तर मोठा गट 8वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये सुद्धा खालील प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले. लहान गटामध्ये प्रथम क्रमांक कुमारी स्वस्तिका योगेश्वर जोशीवर्ग 5वी (301रुपये) द्वितीय क्रमांक चि.सार्थक ज्ञानेश्वर जोशी वर्ग 7 वी (201 रुपये) तृतीय क्रमांक चि. विश्वजीत बालासाहेब सोनके वर्ग 5वी (101रुपये) मोठा गट सर्व प्रथम कु. साक्षी विनायक जाधव वर्ग 8वी (301 रुपये) द्वितीय क्रमांक कु. श्रध्दा अनिल जोगदंड वर्ग 8वी (201रुपये) तृतीय क्रमांक कु. हर्षदा संदीप रोकडे वर्ग 8वी (101रुपये) वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती सिंधुताई चव्हाण होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री बालासाहेब काकडे सर हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. स्नेहल जोशी व कु. सृष्टी पांचाळ या विद्यार्थिनींनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शन रामदास अंबाड सर यांनी केले. आभारप्रदर्शन श्रीमती यादव यांनी केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना महान व्यक्तींच्या विचारांची प्रेरणा मिळाली असून, अशा उपक्रमांमुळे शाळेतील सांस्कृतिक वातावरण समृद्ध होत असल्याचे मत शिक्षकवर्गातून व्यक्त करण्यात आले.