केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा

केज/प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड,सांस्कृतिक विभाग व भाषा विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भाषा विषयक ज्ञान वृद्धीसाठी सामाजिक व शैक्षणिक विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात ही स्पर्धा विनाशुल्क आहे.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सभागृह बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज या ठिकाणी सकाळी दहा वाजता होणार आहे. निबंध स्पर्धेसाठी तीन विषय निवडलेले आहेत यापैकी एका विषयावर स्पर्धकांनी निबंध लिहायचा आहे.या विषयापैकी 1) मोबाईलचा वापर अभ्यास पूरक किंवा मारक, 2 )आजचा विद्यार्थी व संस्कार, 3 )माझा शेतकरी बाप- जगाचा पोशिंदा सोबतच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी 1.लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेब कार्य व कर्तुत्व 2.आजचे राजकारण व लोकशाही जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी यापैकी एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये स्वहस्ताक्षरात निबंध लिहून दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत स्वहस्ते किंवा पोस्टाने भाषा विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड यापत्त्यावर पाठवावा.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे ओळखपत्र गरजेचे आहे.जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धे मध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव फावडे, संयोजक डॉ.चत्रभुज सोळंके,डॉ.एन.जी. काशिद,डॉ.रामचंद्र केदार,डॉ.मनोज माने, डॉ.सुनील राऊत,डॉ. प्रशांत क्षीरसागर,डॉ. प्रकाश खुळे,डॉ.आशा बोबडे यांनी केले आहे.