प्रशासकीयसामाजिक

केज शहरातील फुलेनगर भागात वारंवार वीज पुरवठा खंडित ; नागरिक संतप्त,महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

केज/प्रतिनिधी

केज शहरातील फुलेनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा सलग १० ते १२ तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महावितरणकडून वीज बिल थकीत असल्यास ग्राहकांचे मीटर काही तासांत तोडण्याची कारवाई केली जाते. मात्र,वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तासन्‌तास वीज येत नसल्यास नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची,असा संतप्त सवाल नागरिकां कडून उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे,वीज कार्यालयाचे संपर्क क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.परंतु अनेकदा तक्रार नोंदविण्यासाठी फोन केल्यास संबंधित मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळून येते.

त्यामुळे हे मोबाईल क्रमांक केवळ दिखाव्या साठी आहेत का,असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच व्यावसायिकांच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. वारंवार वीजखंडित झाल्यामुळे फुलेनगर परिसरातील नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा,अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!