सामाजिक

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात ; ५० हून अधिक दात्यांचे रक्तदान

केज/प्रतिनिधी

प्रजावत्सल आणि आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केज शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिराला तरुण आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अत्यंत उत्साही वातावरणात हे शिबिर संपन्न झाले.जयंती उत्सवाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अहिल्यादेवींच्या लोक कल्याणकारी कार्याचे आणि जलव्यवस्थापना तील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. केवळ पारंपारिक पद्धतीने जयंती साजरी न करता,समाजातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या विधायक उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी संयोजकांचे कौतुक केले.

सकाळ पासूनच शिबिराच्या ठिकाणी रक्तदानासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे,यामध्ये पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या नवोदित तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती.यावेळी रक्तदान करून घेण्यात आले.या शिबिरात दिवसभरात एकूण ५० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.सर्व रक्तदात्यांना संयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.शिबीर यशस्वी करण्यासाठी केज शहरातील विविध पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती,शिव मल्हार प्रतिष्ठान मंडळांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.या कौतुकास्पद उपक्रमामुळे केज परिसरामध्ये सर्वत्र समाजोपयोगी जयंती साजरी केल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

आदर्श रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर,रक्तपेढी प्रमुख डॉ.इलियाज पटेल पॅथॉलॉजी पर्यवेक्षक साक्षी बेलोरे,रोहन खरात,संध्या सुरवसे, आनंत सारूक,तसलीम काझी आदींनी रक्त संकलनाचे काम पूर्ण केले.रक्तदाते रंजना रोडे,माऊली रोडे,कृष्णा रोडे, बाबुराव रोडे,राम डुकरे, अशोक निंगुळे, मनोज कदम,अरविंद बोबडे, भारत दांगट,माजी नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट,लक्ष्मण कोल्हे, कृष्णा गाढवे,निखिल काळे,गणेश कांदे, अतिश गाढवे,भागवत काळे,सुभाष निंगुळे, प्रतीक भोसले,आदित्य गायके,ईश्वर गायके, सुंदर रोडे,सागर माळी, दया भोसले,शैलेश भूतकर, केशव रोडे, अरबाज कुरेशी,सार्थक सुडके,संदीप जाधव, नगरसेवक बालाजी जाधव,रंजीत जाधव, सखाराम गायके, उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी गाढवे, अभिजीत भालेकर, ओम मुळे महेश रोडे,प्रशांत गुंड,मंगेश सातपुते,अभी गायकवाड,रामदास डापकर,राम गाढवे, राजेश्वर रोडे आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!