कृषीसामाजिक

सोलार कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्याच्या भुलथापा देऊन जमिनी बळकावल्या,सोलार कंपनीने देवगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय करु नये -रमाकांत बापु मुंडे

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील देवगाव शिवारात उभारण्यात येत असलेल्या सोलार प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही,असा इशारा भाजप नेते रमाकांत बापु मुंडे यांनी दिला आहे. देवगाव परिसरात सोलार कंपनीकडून प्रकल्प उभारणीचे नियोजन करण्यात आले असून अनेक शेतकऱ्यांशी जमिनीचे करार करण्यात आले आहेत.

मात्र,करारा वेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने शेतकरी आणि युवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर रमाकांत बापु मुंडे यांनी शेतकरी व युवकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्यानंतर रेणुकादेवी मंदिर परिसरात बैठक घेण्यात आली.बैठकीत बोलताना मुंडे यांनी सोलार कंपनी च्याअधिकाऱ्यांनी पुढील पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान,उपस्थित शेतकरी आणि युवकांनी विविध समस्या मांडत कंपनीने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.या बाबत माहिती अशी की केज तालुक्यातील देवगाव शिवारात उभारण्यात येत असलेल्या सोलार प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने संबंधित कंपनीने पूर्ण करावीत, अन्यथा शेतकरी व युवकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप नेते रमाकांत बापु मुंडे यांनी दिला.देवगाव शिवारात एका सोलार कंपनीकडून प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठी कंपनीने अनेक शेतकऱ्यांशी जमीन करार केले आहेत.

करार करताना शेतातून जाणाऱ्या पाईपलाईन,पत्र्याचे शेड यांची भरपाई देण्यात येईल तसेच स्थानिक तरुणांना हंगामी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल,असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात या आश्वासनांची अंमल बजावणी होत नसल्याने शेतकरी व युवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.याबाबत देवगाव येथील शेतकरी व युवकांनी भाजप नेते रमाकांत मुंडे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.त्यानंतर शनिवार दि.६ जुन रोजी रेणुकादेवी मंदिर परिसरात बैठक घेण्यात आली. या बैठकीस भाजप नेते रमाकांत बापु मुंडे, प्रा.जीवन नागरगोजे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमाकांत बापु मुंडे यांनी संबंधित सोलार कंपनी च्या अधिकाऱ्यांनी पुढील पाच दिवसांत शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात व त्यावर योग्य तोडगा काढावा,अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल,असा इशाराही त्यांनी दिला. प्रा.जीवन नागरगोजे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता कंपनीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सकारात्मक भूमिका घ्यावी,असे मत व्यक्त केले.बैठकीत उपस्थित शेतकरी व युवकांनी आपल्या विविध समस्या मांडत कंपनीकडून दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!