शैक्षणिकसामाजिक

आनंद भैय्या गायकवाड बी.एस्सी.पदविका परिक्षा उत्तीर्ण, सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव 

केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यातील आनंदगांव येथील आनंद भैय्या वसुदेवराव गायकवाड हे बी.एस्सी.पदविका परिक्षा ७३.१ टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर अंतर्गत तांबवेश्वर कॉलेज ऑफ कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड मॅनेजमेंट महाविद्यालय, केज येथून एप्रिल-मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत बी.एस्सी.तृतीय वर्षात ७३.१ % गुण घेवून प्रथम श्रेणीत आनंद भैय्या वसुदेवराव गायकवाड हे उत्तीर्ण झाले आहेत.

केमेस्ट्री,मायक्रो बायलॉजी,झूलॉजी हे विषय घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.दिनांक ८ जून २०२६ रोजी विद्यापीठा च्या वेबसाईटवर ऑन लाईन निकाल जाहिर करण्यात आला.

यात आनंद भैय्या वसुदेवराव गायकवाड हे ७३.१ % गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यांच्या या यशाबद्दल तांबवेश्वर महाविद्यालयाचे सचिव शिवाजी चाटे,प्राचार्य इंगळे, इतर प्राध्यापक वृंद यासह पालक प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,ज्ञानोबा काका गायकवाड, रामकृष्ण तात्या गायकवाड, नवनाथ बापू गायकवाड, मंगल कबई शिंदे, जान्हवी काकू पतंगे,सविताताई लगड,गणेश गायकवाड, अनिल गायकवाड,दुर्गा गायकवाड, प्रा.लक्ष्मी गायकवाड यांचासह रविंद्र गायकवाड पेन्टर, प्रा.माणिकराव आनंदगांवकर,आनंद धाट,डॉ.जगदीश पैठणकर,सुधीर रानमारे, मधुकर कदम,प्रताप भाकरे,मधुकर भाकरे, वसंत जाधव,एस.एस. शिनगारे,पी.एस.शिनगारे, सौ.छायाताई सोमवंशी, आशालता ताई येळवे, सुमनताई येळवे, सुरेखाताई काळे,प्रा.डॉ. पी.एस.गादेकर,मित्र परिवार यांच्याकडून आनंद भैय्या गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!