जिल्हा परिषद प्राथमीक शाळा राजेगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात संपन्न

केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील राजेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम प्रभात फेरी काढून ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण उपसरपंच ॲड.प्रवीण मेटे यांच्या हस्ते झाले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण माजी सैनिक महादेव सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिर येथे संविधान सामूहिक वाचन,संगीतमय कवायत, कॉपीमुक्त परीक्षा,शपथ बालविवाह निर्मूलन प्रतिज्ञा,शालेय विद्यार्थी भाषणे,क्रीडास्पर्धा बक्षीस वाटप तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिस शेख, प्रमुख पाहुणे उपसरपंच प्रवीण मेटे,युवराज कदम हे होते या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राजेगाव येथील वस्ती शाळेवरील शिक्षक,अंगणवाडी क्र १ व २ शिक्षिका,गावातील तरुण,महिला मंडळ व युवकांचा मोठा सहभाग लाभला.
यावेळी सर्व मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले.आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशी सक्षम होईल यावर सर्वांनीच भर दिला. जिल्हा परिषद शाळा सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण देते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेते हे येथील गावकऱ्यांना दाखवून दिले.यावेळी सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक वरवडे सर व लोटके मॅडम यांनी केले सर्वांचे आभार पत्रकार रवींद्र मेटे यांनी मानले.


