सामाजिक

बीड येथील युवक उमेश दळवी हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून अॕट्राॕसीटी चा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची केज तहसीलदार यांच्याकडे मागणी

केज/प्रतिनिधी

बीड येथील मातंग समाजातील युवक उमेश दळवी याची अत्यंत क्रूर आणि निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवार दि.२५ मे रोजी सकल मातंग दलित चळवळीच्या वतीने केज तहसीलदार यांना तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले.या हत्याकांडात सामील असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार कडक कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उमेश दळवी हा अत्यंत गरीब कुटुंबातील युवक होता.त्याची झालेली हत्या ही विकृत आणि नीच मानसिकते तून झाली असून,या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला गेला आहे,अशा शब्दांत आंदोलकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तात्काळ पावले उचलावीत आणि या संपूर्ण हत्याकांडाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा मातंग समाज रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पीडित दळवी कुटुंब हे अत्यंत गरीब असून, शासनाने त्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.जर या प्रकरणात प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलून आरोपींना योग्य ते शासन केले नाही,तर संपूर्ण मातंग समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.हे निवेदन देते वेळी सकल मातंग दलित चळवळी तील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने रोहित कसबे उबाठा शिवसेना जिल्हा सचिव,बीड,

प्रियांका लांडगे लहुजी शक्ती सेना,शरद थोरात तालुका प्रमुख,आझाद क्रांती सेना,दिलीप गालफाडे तालुका प्रमुख, युवासेना,अनिल लोखंडे उपतालुकाप्रमुख,आझाद क्रांती सेना,विनायक लोंढे तालुकाध्यक्ष,दलित महासंघ,रामेश्वर दुनघव व दुनघव रक्षक यांच्या सह मातंग व दलित समाजातील असंख्य बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालया समोर उपस्थित होते.या घटने मुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!