सामाजिक

पत्रकार संघाकडून संजय भोकरे यांना ‘Z+’ सुरक्षा देण्याची मागणी ; केज तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिले निवेदन

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज तालुक्याच्या वतीने राज्य संघटक तथा दैनिक ‘जनप्रवास’चे समूह संपादक श्री.संजयजी भोकरे यांना तातडीने ‘Z+’ दर्जाचे पोलीस संरक्षण देण्यात यावे,या मागणीचे निवेदन केज तहसील कार्यालयात तहसीलदार श्री.अशोक भंडारे साहेब यांना तसेच केज पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात आले. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत शासनाने तातडीने कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.

पत्रकार संघाने दिलेल्या माहितीनुसार,सांगली पोलिसांनी नुकताच श्री. संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट उधळून लावत तीन आरोपींना अटक केली आहे.या आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले,चार जिवंत काडतुसे तसेच धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस तपासात आरोपी हे फेब्रुवारी महिन्यापासून भोकरे यांची रेकी करत असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वीही साधारण वर्षभरापूर्वी श्री.सिद्धार्थ संजय भोकरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कट रचण्यात आल्याची तसेच धमकीचे पत्र प्राप्त झाल्याची बाब समोर आली होती.त्यामुळे भोकरे कुटुंबीय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या निशाण्यावर असल्याची भीती पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. सध्याच्या घडामोडींनंतर श्री.संजयजी भोकरे यांनी स्वतः पुन्हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केल्याचे पत्रकार संघाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अंबाबाई तालीमसंस्थेच्या जमिनी हडपण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी पत्रकार संघाने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या असून त्यामध्ये श्री.संजयजी भोकरे यांना तातडीने ‘Z+’ दर्जाचे पोलीस संरक्षण देणे, सिद्धार्थ भोकरे यांना पूर्वी मिळालेल्या धमकीची आणिआताच्या कटाची सखोल चौकशी करणे,तसेच या कटा मागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे या मागण्यांचा समावेश आहे.राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्वरित कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!