सामाजिक

देवगांव येथील संयुक्त जयंती निमीत्त भीमगीत कार्यक्रमाला अतुल मुंडे, राहूल गदळे,बचुटे यांची उपस्थिती,बुध्द,फुले, डाॅ.आंबेडकरांची गीते गाऊन व समाज प्रबोधन करुन इंगळेनी उपस्थितांची मने जिंकली

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील देवगांव येथे महामानव तथागत गौतम बुध्द, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमीत्ताने दि.९ मे रोजी शनिवारी संध्याकाळी कवि गायक राजेंद्र इंगळे (भारजकर) आणि पार्टी अंबाजोगाई यांच्या भिमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन देवगावचे सरपंच अतुल दादा मुंडे,भाजपा युवा मोर्चाचे केज तालुका अध्यक्ष राहूल भैय्या गदळे,पत्रकार गौतम बचुटे यांनी केले.या कार्यक्रमाला गावातील नागरीक व महिला व तरुण युवक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

केज तालुक्यातील देवगांव येथे महामानव तथागत गौतम बुध्द, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमीत्ताने दि.९ मे रोजी शनिवारी संध्याकाळी कवि गायक राजेंद्र इंगळे (भारजकर) आणि पार्टी अंबाजोगाई यांच्या भिमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी गौतम बुध्द,क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन  देवगांवचे सरपंच अतुल दादा मुंडे,भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाअध्यक्ष राहूल भैय्या गदळे,पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार अशोक नागरगोजे, उपसरपंच सुभाष मुंडे यांनी केले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल,पुष्पहार देऊन स्वागत केले.संयुक्त जयंती निमीत्त आयोजीत केलेल्या समाज प्रबोधन भीमगीत कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अतुल दादा मुंडे,राहूल भैय्या गदळे,गौतम बचुटे, अशोक नागरगोजे, सुभाष मुंडे यांनी केले.

गायक राजेंद्र इंगळे यांनी समाज प्रबोधन करुन सर्व महामानवांच्या जीवनावर सुमधुर गीते गाऊन उपस्थीत सर्वांचे मने जिंकली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार महादेव गायकवाड,अर्जून गायकवाड,डाॅ.शरद गायकवाड,चिवळा गायकवाड,अरुणकांबळे, विशाल गायकवाड,दैवान कांबळे,शिवाजी गायकवाड,राणु कांबळे, अजय कांबळे यांच्यासह संयुक्त जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!