शैक्षणिक

काळेगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के ;७ विद्यार्थिनींची ९० टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात काळेगाव येथील काळेगाव हायस्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकाल लावला आहे. विशेष म्हणजे, विद्यालयातील ७ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून सुवर्णय़श संपादन केले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची यशोगाथा विद्यालयाच्या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत.प्रथम क्रमांक कु. आगे वेदिका गजानन ९३.४०%,द्वितीय क्रमांक कु.कोठावळे पुजा दत्तात्रय ९२.६०%,तृतीय क्रमांक कु.कोठावळे वेदिका संतोष ९२.००% आणि कु.गिराम वैष्णवी शिवलिंग ९२.००% या व्यतिरिक्त कु.राऊत श्रद्धा शिवदास९१.६०%, कु.सुकाळे अनुष्का सतीश ९१.२०% आणि कु.तुपारे श्रावणी भागवत ९०.००% यांनी देखील नव्वदीचा टप्पा ओलांडला आहे. विद्यालयातील एकूण १६ विद्यार्थी ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखाहारी तात्या गदळे, सचिव जयदत्त गदळे, संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच शाळेने १०० टक्के निकालाचा टप्पा गाठला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे, असे मत प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांनी व्यक्त केले.या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!