आजच्या विद्यार्थ्यांना संस्कार देण्यास पालक कमी पडत आहे.-प्रा. डॉ.कविता गित्ते- कराड

केज/प्रतिनिधी
नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला यात साने गुरुजी निवासी उच्च माध्यमिक विद्यालय केजचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.८९ टक्के तर कला शाखेचा निकाल ७५% असा लागला.यात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील कु.चोले पंकजा महादेव ८१.८३% प्रथम,कु. चव्हाण अंजली आश्रुबा ८०.५०% द्वितीय,कु. आघाव ऋतुजा तात्याराव ८०.१७ % तृतीय,कला शाखेतील चि.खाडे आकाश दत्तात्रय ७२.३३% प्रथम ,कु.मस्के पुजा प्रताप ६९.३३% द्वितीय, कु.चौरे मुक्ता नारायण ६९% तृतीय तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड उपाध्यक्ष राजेश कापसे सर व संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता कराड-गित्ते मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड यांनी सांगितले की, आमच्या शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा ग्रामीण भागातील व ऊसतोड कामगार यांच्या घरातुन आलेला असतो याची आम्हाला जाणीव असते तसेच ते निवासी राहत असल्याने आमचे शिक्षक त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचे काम करत असते. अतिरिक्त तासिका घेण्याचे काम करतात यामुळे येथील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो असे सांगितले. संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता कराड-गित्ते मॅडम यांनी ही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या विद्यार्थ्यांना संस्कार देण्यास पालक कमी पडतात फॅशनच्या आपले मुले मुली संस्कार शुन्य आहे वागत असुन फॅशनच्या दुनियेत आपली संस्कृती विसरत चालले आहेत या मुळे भरकटलेल्या पिढीला घरात संस्कार देणे आवश्यक आहे.
परिक्षा देणा-या मुले मुलींना अभ्यासाबरोबर बाहेरच्या वातावरणाची देणे आवश्यक आहे जर ही माहिती नाही दिली तर तरुणाई व्यसनाधीन होत आहे.मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.या परिक्षा काळात आपल्या भागातील परिक्षेला जात आहे असे सांगून मुली पडून गेल्याचे प्रकार घडले आहेत असे प्रकार जर घडत असतील तर तुम्ही पालक म्हणून व आम्ही शिक्षक म्हणून कुठे तरी कमी पडत आहोत याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे सांगितले या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे माता पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.


