
केज/प्रतिनिधी
केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज च्या संकुलात केज येथील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री सौ.सिमा नंदकुमार गुंड यांच्या बाई अशीच असते या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. कौतिकराव ठाले पाटील अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद,छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली,सुप्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ.ललिता गादगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी प्रमुख उपस्थितीत असणारे गोदा प्रकाशनाचे प्रकाश दादा गोरे यांनी सांगितले की,सिमाताईनी या पुस्तकातून बाईचे जीवन, शेतक-यांचे जीवन या दोन्हीवर मार्मिक कविता लेखन करुन हे पुस्तक वाचकांच्या हातात दिले आहे.यातुन निश्चितच स्त्री कशी असते,ती सर्व बाजू कशा सांभाळते व शेवटी हतबल झाल्यावर ती विठ्ठलाकडे मांगणे मागते लेखनाचा समावेश समावेश यात असल्याचे सांगितले व त्यांच्या लेखनास शुभेच्छा दिल्या.तसेच प्रा.डॉ. ललिता गादगे यांनी पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करुन त्यांच्या कविता लेखनात लय असल्याचे सांगितले थोडक्यात पुस्तकाचे समिक्षण,परिक्षणच वाचकांसमोर ठेवले व लेखिकेच्या लेखनास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांनी लेखकाचे लेखन कसे दर्जेदार होते यावर भाष्य केले व पुढील लेखनास शुभेच्छा दिल्या या पुस्तकातील निवडक कवितांचे अभिवाचन अमिता पेठे, अँड.स्नेहा गुंड यांनी केले.
द्वितीय सत्रात निमंत्रित कविचे कवी संमेलन पार पडले कवि सम्मेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार डॉ. मुकुंद राजपंखे हे होते तर सुत्रसंचलन प्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांनी केले या वेळी वैजनाथ गित्ते,दास पाटील,जयश्री कोकीळ,प्रा.हनुमंत घाडगे,प्रा.डॉ.कविता गित्ते-कराड,अमिता पैठणकर सीमा गुंड,जी. बी.गदळे सर,यांनी काव्यवाचन करून श्रोत्यांची मने जिंकली.या प्रकाशना वेळी मंचावर बीड आकाशवाणीचे निवेदक गोपाळ ठाकुर अँड.रंजित गायकवाड, अँड.उद्धवराव कराड, नंदुकुमार गुंड,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.हनुमंत सौदागर यांनी केले तर कवयित्री सिमा गुंड यांनी लेखिका म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.



