सामाजिक
शिवरामपुरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,विडा यांच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँक विडा शाखेतील नव्याने रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
शिवरामपुरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,विडा यांच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँक,विडा शाखेत नव्याने रुजू झालेले शाखा व्यवस्थापक,कॅशियर तसेच इतर कर्मचाऱ्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पतसंस्थे च्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
बँक व पतसंस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन परिसरातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या आर्थिक सेवा मिळाव्यात,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सत्कार समारंभ प्रसंगी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



