
केज/प्रतिनिधी
केज शहर व तालुक्यातील नवोदित खेळाडूंसाठी विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकॅडमीचे संचालक विनोद गुंड यांनी दिली आहे.
विजय स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने १ मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधी दरम्यान एक महिन्याचे फुटबॉल, व्हॉलीबॉल,क्रिकेट,योगा, बुद्धीबळ आदी खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजन केले आहे.या शिबिरामध्ये शास्त्रशुध्द पध्दतीने क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार असून या शिबिरात १४ वर्षा खालील मुला-मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. हे शिबिर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल च्या मैदानावर सकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे.या शिबिरात केज तालुक्यातील खेळाडूनी सहभागी व्हावे असे आवाहन विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने क्रीडा संघटक विनोद गुंड यांनी केले आहे.



