खा.सोनवणे म्हणाले रेल्वेची स्वप्नपुर्ती होतेय आता पाणी द्या,अन् फडणवीसांकडून दुष्काळमुक्तीचा शब्द, रेल्वे मार्ग उद्घाटन अन् रेल्वे शुभारंभ प्रसंगी खा.सोनवणेंचे धडाकेबाज भाषण

बीड/प्रतिनिधी
बीडला रेल्वे यावी यासाठी बीड जिल्हा रेल्वे कृती समिती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काम केले. अनेक वर्ष रेल्वेसाठी संघर्ष सुरू राहिला. दरम्यान,बीड रेल्वेचे स्वप्न आज पुर्ण होत आहे.आजअहिल्यानगर ते बीड रेल्वे सुरू झाली असून बीड ते परळी पर्यंत कामही गतीने सुरू आहे. रेल्वेची स्वप्नपुर्ती होतेय, मुख्यमंत्री साहेब आता बीडला २५ टिएमसी पाणी द्या,अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, बीडलाही पाणी आणू, असा शब्द यावेळी दिला.बीड येथील रेल्वे स्थानक येथे अंमळनेर ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभांरभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री पंकजा मुंडे, खा.रजनीताई पाटील, आ. धनंजय मुंडे , आ.विजयसिंह पंडित, आ.नमीता मुंदडा,आ. विक्रम काळे,माजी आ.भिमराव धोंडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातीलनागरिकांना रेल्वे येत असल्याचा आज आनंद होत आहे. अंमळनेर ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभांरभ होत असून बीड रेल्वेसाठी कृती समितीने मोठे काम केले.यात नामदेवराव क्षीरसागर,हनुमंत उपरे, अमोल गलधर आदिंसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जनतेने लढा उभा केला.त्याचमागणी चे आज आपण फलीत पाहत आहोत.मागील पन्नास वर्षांपासून आपण रेल्वेची मागणी करत होतो.
आज रेल्वेची मागणी आणि स्वप्नही पुर्ण होत आहे. अहिल्यानगर ते परळी अशी रेल्वेची लांबी ही २६१ किलोमिटर आहे. त्यापैकी मार्च २०२४ पर्यंत ९९ किलोमिटर पुर्ण झाली आणि आपल्या कार्यकाळात आजपर्यंत ६७ लांबी पुर्ण झाली. ज्या दिवशी खासदार झालो, त्यानंतर पहिली बैठक रेल्वेची घेतली.तुमच्या सर्वांच्या आर्शीवादाने खासदार झाल्यानंतर मी सालगडी म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.रेल्वे ट्रॅक टाकून घेण्यापासून प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडविण्या साठी प्रयत्न करतआहे. आतापर्यंत १६ बैठका आपण घेतल्या.
रेल्वे अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत भेटत आहे. याच कारणाने आपल्या रेल्वेच्या कामाला गती मिळालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला निधी देत आहेत. बीडकरांची बार्शीनाक्या वरील थांब्याची मागणी आहे, त्यासाठी आपला प्रस्ताव गेलेला आहे. रेल्वेमुळे विद्यार्थी, गोरगरिब आणि शेतकऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी उपयोग होणार आहे.
आता डिझेलवर रेल्वे सुरू होत आहे.परंतु हायस्पिड रेल्वे ही लाईटवर धावणार आहे. त्यासाठी आष्टी आणि सिरसाळा येथे दोन सबस्टेशन होत आहेत. ते काम लकवरच पुर्ण होईल .मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिजोरी चे मालक आहेत , ते या कामासाठी हात मोकळे सोडतीलच ,असा विश्वास आहे. दरम्यान, मराठवाड्याचा पाण्याचा अनुशेष भरून काढा. आम्हाला उजनीतून २५ टिमएसी पाणी मांजरा धरणात द्या आणि तिथून ते मांजरसुंब्याला आणि,जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त होईल ,असे खा.सोनवणे म्हणाले.
खा.सोनवणेंना रेल्वेप्रवासाचा मान
बीडला रेल्वे आलीच पाहिजे,अशी मागणी वर्षानूवर्षे सुरू होती. अखेर ही मागणी आता पुर्ण झाली असून दि.१७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर अशी पहिली रेल्वे सुरू करण्यात आली.या पहिल्या प्रवाशी रेल्वेत खा.बजरंग सोनवणे यांनी प्रवास केला. त्यांच्यासोबत बीड मधील रेल्वे लढ्यात सहभागी झालेले नागरिक देखील सहभागी झाले होते.
खा.सोनवणेंच्या पोस्टरने वेधले लक्ष
बीड येथील रेल्वे स्थानक येथील अंमळनेर ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभांरभ कार्यक्रमात खा.बजरंग सोनवणे यांचे ‘कार्यक्षमखासदार’ असे लिहलेले पोस्टर तरूणांनी आणले होते. अगदी सर्व कार्यक्रमात या पोस्टरने लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमांसह रेल्वे प्रवासातही तरूण असे पोस्टर घेवून फिरताना दिसले.कार्यक्रमा दरम्यान,पोस्टर हातात घेत खा.बजरंग सोनवणे तुम आगे बढोच्या घोषणांनी यावेळी तरूणांनी दिल्या.



