

केज/प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून केज तालुक्यात औद्योगिक क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले आहे.सूतगिरणीच्या अध्यक्षा माजी आमदार संगीताताई ठोंबरे, उपाध्यक्ष डॉ. विजयप्रकाश ठोंबरे व कार्यकारी संचालक अनिल पाखरे व सर्व संचालक मंडळ यांच्या अथक परिश्रमातून आणि मार्गदर्शनातून हा प्रकल्प आता खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला असून,सुत गिरणीत उत्पादित झालेला पहिला सूत (Yarn) विक्रीसाठी इचलकरंजीच्या बाजार पेठेत रवाना झाला आहे.
ठळक मुद्दे
बाजारपेठेत पदार्पण:
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी केज जिल्हा बीड येथे नव्याने सुरू झालेल्या सूतगिरणीचे सुत (yarn) इचलकरंजी मार्केटमध्ये विकण्याचा शुभारंभ झाला.माजी मंत्री प्रकाश आवाडे,वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, प्रसिद्ध सुताचे व्यापारी अरुण कुमार गोयंका यांच्या शुभहस्ते करण्यात आले,यावेळी माजी आमदार राजेश पाटील, श्री.उल्हास सूर्यवंशी, कार्यकारी संचालक अनिल पाखरे व इचलकरंजी शहरातील अनेक उद्योजक उपस्थित होते.
यशस्वी नेतृत्व:
संगीताताई ठोंबरे यांनी स्वतः या प्रक्रियेत लक्ष घालून,मालाची विक्री व्यवस्था लावून दिली आहे.
रोजगार निर्मिती:
या सूतगिरणीमुळे केज तालुक्यातील शेकडो तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे.
शेतकऱ्यांना आधार:
परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता आपल्या मालासाठी हक्काची बाजारपेठ स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.
माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांची प्रतिक्रिया
“स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न आणि महाराष्ट्र सरकार मधील वस्रोद्योग व सामाजिक न्याय विभागातील सर्व मंत्री व अधिकारी यांच्या मार्गदर्शन मुळेच हा प्रकल्प उभा राहू शकला. केज तालुक्याचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इचलकरंजी बाजारपेठेत आपल्या गिरणीचे सूत पोहोचणे,हा आमच्या सर्व कामगारांच्या आणि सभासदांच्या कष्टाचा विजय आहे.”
तालुक्यात आनंदाचे वातावरण
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने केज तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला या प्रकल्पामुळे मोठी बळकटी मिळणार आहे. सूतगिरणीच्या या यशा बद्दल सर्व स्तरांतून मा. आ.संगीताताई ठोंबरे व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.



