सामाजिक

बहुजन जेष्ठ नागरिक मंच केजच्या वतीने एक्वागार्ड पाणपोईचे उदघाट्न संपन्न      

केज/प्रतिनिधी

बहुजन क्रांती मोर्चा व झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती,तसेच बहुजन जेष्ठ नागरिक मंच,केज यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासुन केज शहरात महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बाबुराव गालफाडे सर यांच्या मार्गदर्शना खाली इरफान पठाण,अनिल लोखंडे, अजय गालफाडे,वैजनाथ क्षिरसागर,शहाजी जाधव सर,दगडू तात्या गालफाडे,सिताराम वैरागे,अमोल मस्के, बाळासाहेब गालफाडे, भिमराव हजारे,मनोहर गालफाडे,गंपू मस्के, दासराव कसबे,अर्जुन शिंदे इत्यादी युवा कार्यकर्ते यांनी सहकार्य केले आहे.

या पाणपोईचे उद्घाटन केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.सिताताई बनसोड तसेच जनविकास फाउंडेशन चे प्रमुख हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाणपोई चालू केल्याबद्दल नगराध्यक्षा डॉ.सौ.सिताताई बनसोड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.व धन्यवाद दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!