सामाजिक

विक्रमराव मुंडे पोद्दार लर्नीँग स्कूल केज येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी, रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

केज/प्रतिनिधी

विक्रमराव मुंडे पोद्दार लर्नीँग स्कूल,केज येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय बीड डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड,बीड यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. स्पर्धेचा शुभारंभ संस्थेचे विश्वस्त विजयकांत मुंडे व प्राचार्या माधुरीताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महात्मा फुले यांच्या शिक्षण विषयक विचारांचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये रांगोळी स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व,समता व बंधुता यांसारख्या विषयांवर आधारित सुंदर व आकर्षक रांगोळ्या साकारून सामाजिक संदेश दिला.त्यांच्या कलाकृतींमधून सर्जनशीलता व सामाजिक जाणीव स्पष्टपणे दिसून आली. तसेच वक्तृत्व स्पर्धाही उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर,स्त्री शिक्षणा तील योगदानावर तसेच समाज सुधारणांवरील त्यांच्या विचारांवर प्रभावी भाषणे सादर केली.या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याची जडणघडण होत असल्याचे दिसून आले.कार्यक्रमा दरम्यान शिक्षकवृंदानेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महात्मा फुले यांच्या कार्याचा सखोल परिचय करून दिला.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेचे शिक्षकवृंद लोकेश शहा सर, भन्साळी मॅडम,आदिती पाटील मॅडम,गणेश काळे सर,शरद चवरे सर,इंगळे सर,धनंजय मस्के सर,शीलवंत सर, अमर सर,ओम ठोंबरे सर,नवीन सर,सोमनाथ सर,रवी त्रिभुवन सर, शुभांगी सगरे मॅडम, सुमय्या आतार मॅडम, झीनत मॅडम,घोळवे मॅडम,राजमाने मॅडम, तेजश्री सगरे मॅडम,लीना त्रिभुवन मॅडम,अश्विनी मगर मॅडम,प्रणिता वाघमारे मॅडम,अश्विनी वडगावकर मॅडम, अश्विनी सुरवसे मॅडम, ओव्हाळ मॅडम,मेघा मोरे मॅडम,पल्लवी कुलकर्णी मॅडम,विशाखा मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.शेवटी स्पर्धांमधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.एकूणच हा कार्यक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!