स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेतील सात विद्यार्थ्यांची राजर्षी शाहू महाविद्यालय व संत तुकाराम महाविद्यालय स्क्रीनिंग टेस्ट द्वारे निवड

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेतील ७ विद्यार्थ्यांची राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर तसेच संत तुकाराम महाविद्यालय लातूर स्क्रीनिंग टेस्ट द्वारे निवड झाली आहे.यामध्ये राजर्षी शाहूमहाविद्यालय लातूर स्क्रीनिंग टेस्टमध्ये- श्रावण रामदास चाटे, आकांक्षा दीपक सांजुरे, प्रज्ञा दिनकर घुले,श्रेयश रघुनाथ बनसोडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तर संत तुकाराम महाविद्यालय लातूर स्क्रीनिंग टेस्टमध्ये-सई बालाजी साखरे,ज्ञानदा सुनील गायकवाड, आयुष जयप्रकाश सातपुते या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
वरील विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे,उपाध्यक्ष नईमोद्दीन इनामदार, सचिव जी.बी.गदळे, सहसचिव तथा मुख्याध्यापक उपेंद्र कोकीळ,कोषाध्यक्ष फजीलोद्दीन काझी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शैलाताई इंगळे, स्वयंअर्थ शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायणराव अंधारे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,प्राचार्य शंकर भैरट सर, प्राथमिक विभागाचे मु. अ.वसंत शितोळे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


