अरुणराव अंजान यांना पितृशोक, लक्ष्मणराव अंजान यांचे वृद्धाप काळाने दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ केज चे सदस्य तथा शीतल ट्रेडर्सचे संचालक अरुण जी अंजान व इंजिनिअर ज्ञानोबा अंजान यांचे वडील श्री.लक्ष्मणराव संभाजी अंजान यांचे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ९६ वर्षे इतके होते. अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी सनगाव ता. अंबेजोगाई (लोखंडी सावरगाव पासून पश्चिमेस ३ किलोमीटर अंतरावर ) येथे मंगळवार दि.३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पार पडणार आहेत.त्यांच्या पाठीमागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांना रोटरी क्लब ऑफ केज, केज तालुका व्यापारी महासंघ व केज वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.



