रस्ते अपघात ग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली पी एम राहत योजना प्रभावी पणे राबवा – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी
रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः उपलब्ध करून देणाऱ्या पी एम राहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी मधील राज्य आरोग्य हमी सोसायटीची भूमिका महत्त्वाची आहे.रुग्णांना गोल्डन अपार मध्ये तातडीचे उपचार देऊन मृत्यू दर कमी करण्यास कटिबद्ध राहावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील जनतेला केले आहे.
मंत्रालयात आयोजित जन आरोग्य योजनेच्या बैठकीत करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचारमिळावेत यासाठी प्रधानमंत्री रस्ता अपघातग्रस्त रुग्णालयीन उपचार आणि हमी उपचार(पी एम-राहत) योजना आणली आहे या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी करत असलेल्या राज्यातील कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेल्या अपघात ग्रस्तांना तातडीने सात दिवसापर्यंत दीड लाख रुपयापर्यंत उपचार पूर्णता निशुल्क रोख रहित देण्यात येत आहेत अनेकदा अपघात झाल्या वर आर्थिक अडचणीमुळे उपचारास विलंब होतो वेळीच उपचार मिळत नाहीत.
पी एम -राहत योजनेची प्रभावी अंमल बजावणी झाल्यास अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.पी एम- राहत योजनेच्या प्रभावी अंमल बजावणीत राज्य आरोग्य सोसायटी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असून रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात दाखल करणे पोलिसांकडून अपघाताची खात्री करून उपचारांना मान्यता देणे या योजनेअंतर्गत उपचारास मंजूरी देणे व मंजूर दावे जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करण्याची आरोग्य सोसायटीची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रात (पी एम -राहत) योजना राबवण्या साठी परिवहन विभागाच्या अखत्यारीत राज्य रस्ते सुरक्षा परिषद ही नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून योजनेची एक परिपूर्ण परिवहन विभागामार्फत दिली जातात रस्ते अपघातानंतर २४ तासाच्या आत रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व अपघात ग्रस्तांना भारतीय तसेच परदेशी नागरिकांनाही पीएम- राहत योजनेचा लाभ मिळणार आहे. उपचार खर्चअपघाताच्या तारखेपासून कमाल सात दिवसापर्यंत समाविष्ट (आवृत) केला जाणार आहे या योजनेअंतर्गत नियुक्त (निर्दिष्ट) व अनियुक्त (अनिर्दीष्ट) रुग्णालयामध्येही उपचार करता येणार आहेत व पी एम जे ए वाय,एम जे पी जे ए वाय व पी एम राहत योजनेत समाविष्ट अंगीकृत रुग्णालय (निर्दिष्ट)रुग्णालय आहेत या व्यतिरिक्त सर्व रुग्णालय अनियुक्त (अनिर्दीष्ट) रुग्णालय आहेत.
या सर्व रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णास स्थिरीकरण उपचार अपेक्षित आहे. स्थिरीकरण उपचारानंतर रुग्णास पुढील उपचारा साठी नियुक्त (निर्दिष्ट) अंगीकृत रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे आपत्कालीन परिस्थितीत नागरिक ११२ या आपत्कालीन प्रतिसाद साह्य प्रणाली क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व प्रमुख अधिकारी उपस्थित होते तरी सदरील योजना संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातही प्रभावीपणे राबवावी असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



