सामाजिक

भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी व्यंकटेश महाजन तर सचिवपदी श्रीधर खोत यांची निवड 

केज/प्रतिनिधी

समस्त ब्राह्मण समाज केज तालुका परशुराम जन्मोत्सव समितीची बैठक शिवराज मुथळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते व्यंकटेश महाजन यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.दि.१८ एप्रिल व १९ एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी यावेळी परशुराम जन्मोत्सवाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व्यंकटेश महाजन यांची अध्यक्ष, प्रल्हाद देव केजकर उपाध्यक्ष,श्रीधर नाना खोत सचिव,श्रीराम शेटे कोषाध्यक्ष, चंद्रकांत पाटील प्रसिद्धी प्रमुख तर सदस्यपदी श्रीनिवास केजकर,धनंजय कुलकर्णी,प्रदीप कुलकर्णी,चंद्रकांत कुलकर्णी विडा,समीर देशपांडे,अनंत देवा कोकीळ,आनंद कुलकर्णी शिरूर घाट, ऋषिकेश पाटील मांगवडगाव,संदीप जोशी रामवडगाव,शिवाजी कुलकर्णी दीपेवडगाव, गणेश कुलकर्णी तांबवेकर,किरण तांबवेकर,महेश कुलकर्णी येवतेकर, व्यंकट पांडव सारणी सांगवी व समस्त ब्राह्मण समाज केज तालुका अशी कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे.

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दि. १८एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर व रांगोळी स्पर्धा होतील तर दि.१९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मोटार सायकल रॅली हनुमान मंदिर वकील वाडी पासून निघेल कानडी रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड मार्गे जय भवानी चौक , मंगळवार पेठ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,गुंड गल्ली, शुक्रवार पेठ बालाजी मंदिर येथे संपन्न होईल.

बालाजी मंदिर येथे ह.भ.प. लक्ष्मण इनामदार गुरुजी यांचे व्याख्यान तसेच भगवान परशुराम प्रतिमा पूजन,आरती व प्रसाद व नंतर कार्यक्रम संपन्न होणार आहे.असे समस्त ब्राह्मण समाज केज तालुका यांच्या वतीने बैठकीत ठरले आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ब्राह्मण समाज तालुका केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!