शेतकरी कामगार पक्षाच्या अन्नत्याग आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार – उपनेत्या मा.आ.संगिता ठोंबरे

केज/प्रतिनिधी
केज येथे शेतकरी कामगार पक्षाच्या अन्नत्याग आंदोलनाला शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे व जिल्हाध्यक्ष सचिन मुळुक यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला आहे.न्याय मिळवण्याठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटुन केजवासियांना न्याय मिळुन देण्यासाठी भाई मोहन गुंड यांच्या आंदोलनात शिवसेना खंबीरपणे मागे उभी आहे असा शब्द संगिता ठोंबरे यांनी भावना व्यक्त करताना दिला.
भ्रष्टाचाराची मालिका बघुन चक्क झालो आहोत,गलथान कारभारामुळे खुप लोकांचे नुकसान झाले आहे,याचा जवाब द्यावा लागेल आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत अशा भावना जिल्हा अध्यक्ष सचिन मुळुक यांनी व्यक्त केल्या. यावेळी विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील,दत्तकुमार काकडे महेंद्र चाटे,मालोजी नाना गलांडे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी उपस्थित होते.दोन्हीही नेत्यांचे भाई मोहन गुंड यांनी आभार मानले आहेत.



