सामाजिक

केज नगरपंचायत मध्ये २०१५ ते २०२६ काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची शेकाप ची मागणी,मुख्य सचिव व नगरविकास प्रधान सचिवांना निवेदन; समिती नेमली तर अजुन गैरव्यवहार उघडकीस येतील – भाई मोहन गुंड 

केज/प्रतिनिधी

केज नगरपंचायतीतील २०१५ ते २०२६ या कालावधीत विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत थेट राज्याचे मुख्य सचिव व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे दिलेल्या निवेदनात शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड म्हटले आहे.

केज नगर पंचायतीमध्ये रस्ते, नाल्या,सभागृह या सारखीच कामे वेगवेगळ्या योजनेतून वेगवेगळ्या नावाखाली पुन्हा पुन्हा निधी उचलल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जनरल निधी आणि विकास कामांवरील खर्च यामध्ये ताळमेळ नसल्याचे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रस्त्याचे ठिकाण बदलून इतर ठिकाणी अनेक शहरांमध्ये रस्ते पुढाऱ्यांच्या वस्तीमध्ये सोयीप्रमाणे नियमाबाह्य करण्यात आले आहेत,

शहरातील नागरिकांना घरकुलासाठी कागदपत्र गोळा करायला लावली आणि त्यांना नगर पंचायतचा कर भरायला लावला अजून त्यांना घरकुल नाही तर काही घरकुलधारकांचे घरकुल तयार झाले मात्र त्यांना पहिलाही हप्ता ही मिळालेला नाही.सन २०१८-१९ मधील पंतप्रधान आवास योजने त पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचे सुमारे ३ कोटी ६२ लाख रुपये अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात सध्या चौकशी सुरू असली तरी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अपहाराची रक्कम परत मिळावी लाभार्थ्यांना हक्काची घरे द्यावीत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

घरकुल घोटाळ्यात सहभागी असलेले अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी,दलित वस्ती सुधार योजनेतील निधी गायब झाला आहे दि.५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ३२.९५ लाखांच्या फुलेनगर मधील सभागृह कामाच्या निधीचा खर्च करण्यात आला नाही. रस्ते व घनकचरा घोटाळा रस्त्यांच्या कामात एकाच कामासाठी दोन वेळा निधी खर्च स्वच्छता अभियानात दुहेरी बिलिंग घंटागाड्या व वाहन खरेदीत अनियमितता घनकचरा व्यवस्थापनात मोठी अफरातफर झाली आहे.

मंगळवारपेठ कॉर्नर विजयप्रकाश ठोंबरे यांचे घर ते आंबेडकर चौक रस्ता – कामासाठी ८० लाख ६० हजार रुपये मंजूर होते.सदर काम प्रत्यक्ष न करताच बिल उचलल्याची दाट शक्यता असल्याने याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी. दि.३१/१२/२०२१ रोजी दलित वस्ती सुधार योजनेतून फुलेनगर रस्त्यासाठी मंजूर १ कोटी ६३ लाख ६३ हजार रुपयांच्या कामाची गुणवत्ता आणि कागद पत्रांची चौकशी व्हावी. जमीन नोंदणी फेरफार प्रकरण ही संशयात आहे व फेरफार प्रक्रियेत ही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून,या प्रकरणाची ही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२०१५ ते २०२६ या कालावधीतील सर्व विकास कामांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित करून त्यामध्ये स्थानिक नागरिकांचा ही समावेश करावा.केज नगर पंचायतीतील घोटाळ्यांची व्याप्ती पाहता,हा केवळस्थानिक पातळीवरील मुद्दा नसून राज्यस्तरीय चौकशीचा विषय बनला आहे.आता शासन काय भूमिका घेते ? आणि दोषींवर कारवाई होते का?याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.केज नगर पंचायतची सन २०१५ पासुन भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये शासनाने समिती स्थापन करून सखोल चौकशी केली तर जवळपास ५० कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचारझाल्याची माहिती समोर येईल अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलीआहे.

केज नगरपंचायत हद्दीमध्ये अनेक वर्ष शेती योजना बंद आहेत, घरकुलाचे पैसे परस्पर उचलले आहेत.ज्यांनी घरकुल बांधले त्यांना अजुन एक ही हप्ता मिळाला नाही, स्वच्छतेच्या नावाने कोटी रुपयांचा चुराडा,महिना महिना पाणी नळाला येत नाही,नगरपंचायत हद्दीत कुठलेही विकास कामांचे नियोजन नाही,सर्व सामान्य शहरांतील नागरिकांच्या प्रश्नांवर लवकरच बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!