आधार उद्योजकता प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने केज येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

केज/प्रतिनिधी
केज शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे आधार उद्योजकता प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने केज येथे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यातआले.शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणामध्ये शेळ्यांचे आजार,उपचार लसीकरण,चारा व्यवस्थापन शेड व्यवस्थापन,तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना,त्यासाठी लागणारी कागदपत्रे प्रोजेक्ट रिपोर्ट नमुना शासकीय योजनांची किट अनुभव प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी देण्यात आले.
यामध्ये आधार उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे मुख्याधिकारी राजेंद्र कांबळे,प्रकल्प अधिकारी निलेश मोटे, डॉ.गणेश गवळी,तज्ञ प्रशिक्षक जयंत कांबळीकर आदींची उपस्थिती होती.पशु संवर्धन प्रशिक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. थळकरी यांनी मार्गदर्शन केले.प्रशिक्षणात तालुका भरातून शेतकरी,युवक यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.



