शैक्षणिकसामाजिक

नवीन अभ्यासक्रमात इयत्ता साहावी पासूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य – डॉ.भागीरथी गिरी 

केज/प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्था अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुक्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व प्रत्येकी एक शिक्षक यांना दोन दिवसाचे व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योजिकता या संदर्भाने प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.भागीरथी गिरी म्हणाल्या की,आता शिक्षणात बराच बदल झाला आहे.पूर्वीप्रमाणे शिक्षण राहिलेले नसून काळाबरोबर शिक्षणात बदल होत आहेत.मागे दहा वर्षाला एकदा अभ्यासक्रम बदलायचा परंतु आता दरवर्षी अभ्यासक्रम व शिक्षणात अपडेट येत आहे. त्याप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे.

यापुढे सर्वांनाच शिक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळेलच असे नाही म्हणून नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये इयत्ता सहावीच्या वर्गापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलानुसार, आवडीनुसार त्याला शिक्षणा बरोबरच व्यावसायिक शिक्षण पालकांनी व शिक्षकांनी शालेय जीवनापासूनच देण्यास सुरुवात करावी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुलांना त्यांच्या आवडी नुसार शिक्षण घेऊ द्या त्यांच्यावर पालकांच्या अशा अपेक्षांची ओझे लादू नका मुले नक्कीच स्पर्धेत टिकतील व स्वतः सक्षम बनतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.तसेचयावेळी केजचे अध्यक्ष अॕड. उद्धवराव कराड सर यांनी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कौशल्या धिष्ठित रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन स्वतः सक्षम बनावे व रोजगार शोधणारा न बनता रोजगार देणारा बनावे असे मत व्यक्त केले.

या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करूनदेणे, करियर मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी अशा अनेक विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता व केज तालुक्याचे समन्वयक डॉ.जयपाल कांबळे सर, सुलभक श्री.मधुकर घुगे सर,श्री.बनकर सर,डॉ. कविता गित्ते मॅडम आदी उपस्थित होते.केज तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व प्रत्येकी एक शिक्षक मोठ्या संख्येने प्रशिक्षणास उपस्थित राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!