श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, परिसरातील कतृत्वत्वान महीलांचा सन्मान संपन्न
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामीण भागात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या श्रीसंस्कार इंग्लिश स्कूल व श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याविषयी सविस्तर वृत्त असे कि,ग्रामीण भागातील कतृत्ववान महिलांचा आदर सत्कार व्हावा या सामाजिक बांधीलकीने श्री संस्कार एज्युकेशन ग्रुपच्या वतीने परिसरातील कतृत्ववान महिलांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चिंचोली माळीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. रोहिणीताई सुनिल देशमुख,प्रमुख पाहुण्या केज पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती सविता शेप मॅडम,श्रीमती डॉ.शीला कांबळे वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ.केंद्र चिंचोली,सौ.पुष्पा साबळे मॅडम,शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक चिंचोली माळी,कु. दिपाली राजेंद्र राऊत, यशस्वी युवा उद्योजीका, सौ.शुभांगी गोविंद ढवारे, जीएसटी अधिकारी, नवीन मुंबई,श्रीमती सुप्रिया बनकर,कनिष्ठ सहाय्यक पं.स.केज,सौ. सोनाली राजाभाऊ राऊत,ग्रामविकास अधिकारी मैंदवाडी घागरवाडा,सौ.प्रतिभा महारुद्र लिगाडे, सामाजिक कार्यकर्त्या, श्रीमती अनुसया वायबसे, बीड जिल्हाध्यक्ष अंगणवाडी संघटना. तसेच उपस्थित सर्व माता पालकांचा व श्री संस्कार इंग्लिश स्कूल च्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.



