ग्राहकांचे हित जपणे ही अस्थापनांची जबाबदारी -डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड


केज/ प्रतिनिधी
ग्राहकांचे हित जपने ही प्रत्येक क्षेत्रातील अस्थापनांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता.केज जि. बीडचे संस्थापक,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले कि, ग्राहकांचे हित जपणे ही प्रत्येक अस्थापनेची जबाबदारी आहे असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.दि. १५ मार्च २०२६ रोजी आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक ग्राहक दिन परिसंवाद, ग्रंथवाचन,तसेच बेडूक उड्या,लंगडी स्पर्धा, खो-खो स्पर्धा घेवून साजरा करण्यात आला.
सकाळी ९ ते १० या वेळेत परिसंवाद घेण्यात आला.माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव,अरुण गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांनी सहभागी होवून विचार व्यक्त केले.९ ते १० या वेळेत ग्रंथवाचन घेण्यात आले.अंकितागायकवाड, ज्ञानेश्वरी पुंड,श्रुती पुंड, वेदिका गायकवाड यांच्या सह विद्यार्थी वाचकांनी सहभाग घेतला.११ ते १२ या वेळात बेडुक उडया घेण्यात आल्या.
यात प्रथम सुशांत सौदागर,द्वितीय आनंद गायकवाड,तृतीय शिवम गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले.१२ ते १ या वेळेत लंगडी स्पर्धा घेण्यात आल्या.यात प्रथम वेदिका गायकवाड, द्वितीय आनंद गायकवाड,तृतीय शिवम गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले.१ ते २ या वेळेत खो – खो स्पर्धा घेण्यात आल्या.यात हरिओम गायकवाड, विराज राऊती,आनंद गायकवाड,सुशांत सौदागर,सोहम गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले.२ ते ३ या वेळेत बक्षीस वितरण डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, अंकिता गायकवाड, ज्ञानेश्वरी पुंड,श्रुती पुंड, रविराज गायकवाड, शिवतेज गायकवाड यांचे हस्ते बक्षीस वितरण व समारोप करण्यात आले.
शेवटी अध्यक्षीयसमारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.मोठ्या संख्येने, वाचक,ग्राहक,विद्यार्थी, विद्यार्थिनी,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.



