सामाजिक

माजी सैनिक चंद्रकांत कसबे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व मान्यवरांची उपस्थिती

केज/प्रतिनिधी

माजी सैनिक तसेच एस बी आय बँक केज येथील माजी कर्मचारी चंद्रकांत ज्ञानोबा कसबे कोरेगाव यांचा वाढदिवस बीडरोड येथील पोलीस स्टेशन परिसरात सायंकाळी ७ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजाप्रती असलेली आपुलकी यामुळे चंद्रकांत कसबे हे परिसरात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,मित्र परिवार, पत्रकार बांधव व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे,प्रा. रमेश पाटोळे, आसाराम बाबर,आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद थोरात,पत्रकार प्रदीप गायकवाड, लिंबराज गायकवाड,डॉ. क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून चंद्रकांत कसबे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांनी चंदू कसबे यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत पुढील काळातही ते समाजा साठी प्रेरणादायी कार्य करत राहावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. वाढदिवसाचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!