युसुफवडगाव केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसूफ वडगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच महेश लामतुरे,गटशिक्षण अधिकारी सुनील केंद्रे, विस्तार अधिकारी संजय चौरे,केंद्रप्रमुख अर्जुन बोराडे,शालेयव्यवस्थापन समिती अध्यक्ष ओंकार लामतुरे,उपाध्यक्षा चंद्रकांता निशिगंध,प्रमुख पाहुणे अरुण राऊत यांच्या सह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.उद्घाटनपर कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेत पाल्य घालणाऱ्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ करण्यात येणार अशी ग्रामपंचायतच्या वतीने घोषणा करण्यात आली.
स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली. महापुरुषांचा विचारांचा संदेश देणारी गाणी, महिलांचा सन्मान याबाबत प्रबोधनकरणारी गीत सादर करण्यात आले.मराठमोळ्या लावणीवर प्रेक्षकांनी ठेका धरला. कार्यक्रमास गावातील महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक शिवहार चोपणे यांनी व्यक्त केले.



