सामाजिक

आवसगाव येथे जागतिक महिला दिना निमित्त उखाणे स्पर्धा उत्साहात संपन्न, जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग,विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने रंगला कार्यक्रम

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील आवसगाव येथे जागतिक महिला दिना निमित्त जिल्हा परिषद शाळा आवसगाव यांच्या वतीने महिलांसाठी उखाणे स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांच्या सादरी करणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षिका तसेच पालक प्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी महिलांनी “आई मायेचा सागर” या पेटी वरील गीताचे सुंदर सादरीकरण केले तसेच काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थिनींनी “जन्म बाईचा” आणि “बाईपण भारी देवा” या गीतांवर आकर्षक सादरी करण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यानंतर उखाणे स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत जवळपास ४० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वाधिक उखाणे सादर करत प्रथम क्रमांक श्रीमती गंगासागर श्रीकृष्ण शिनगारे यांनी पटकावला.द्वितीय क्रमांक श्रीमती छाया सोमनाथ पोतदार यांनी मिळवला.तर जास्त शब्दांचा मोठा उखाणा सादर केल्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीमती मोहरबाई जीवन शिनगारे व श्रीमती उषाबाई भरत साखरे यांना देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका श्रीमती साठे मॅडम,श्रीमती कुलकर्णी मॅडम व श्रीमती जाधव मॅडम यांच्यापुढाकारातून करण्यात आले.यावेळी उपस्थित माता-भगिनींना महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व व महिलांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्यासुरुवातीला उपस्थित महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती साठे मॅडम यांनी केले. महिलांना विशेष मार्गदर्शन श्रीमती जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केले. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!