
केज/प्रतिनिधी
दि.११ मार्च २०२६ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील आरोग्य उपकेंद्र दि.०६ मार्च-२०२६ पासुन कायम बंद असल्याने ग्रामस्थांनी अधिक्षक प्राथमिक आरोग्य उप केंद्र विडा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय व दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत असल्याने आजारी रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसुन येत आहे.रूग्णांना नाहक खिशाला आर्थिक कात्री लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जीवाचीवाडी येथे युनानी दवाखाना आहे.तेथील कर्मचारी जागा भरल्या नाहीत एक सेवक होते ते बदली करून गेले,त्या जागी दुसरा कर्मचारी आलेच नाहीत.आरोग्य उप केंद्रात चार कर्मचारी आहेत. एमपीडब्लु व नियमित आलेले दिसत नाहीत.तिन महिला कर्मचारी आहेत त्यापैकी एकीची गेल्या तिन वर्षा पासुन दुसऱ्या गावात प्रतिनियुक्ती केली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी,ए एन एम दोन्ही सहा दिवसा पासुन अनुपस्थित असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी यांची पाठराखण आहे काय ? त्यांना अभय कोणाचे आहे ?जीवाची वाडी आरोग्य उप केंद्र कायम बंद असल्याने वरीष्ठ काय कारवाई करनार याकडे ग्रामस्थ लक्ष वेधुन आहेत.
आमच्या प्रतिनिधीने भ्रम्हणध्वनी द्वारे विचारणा केली असता
माझे मुल आजारी असल्याने,मी तीन दिवस किरकोळ रजा घेतली असुन परत वैधकीय रजा घेतली आहे.श्रीमती सुरेखा सानप, ए एन एम,जीवाचीवाडी
आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता
शनिवार पर्यंत मी होते, नंतर नाही.श्रीमती वर्षा गव्हाणे समुदाय आरोग्य अधिकारी,जीवाची वाडी.
तीन दिवसापासुन बंद आहे.
डॉ.रोशनकुमार गायकवाड,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र,विडा.



