गावखेडे,ग्रामीणभारताचे स्वप्न अपूर्ण ; शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार ? -खा.रजनीताई पाटील खा.रजनीताई पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

केज/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जनता बेरोजगारी,महागाईने होरपळून निघत आहे. शेतकरी संकटाशी लढत आहेत ग्रामीण विकास मंत्रालयाने घोषणा केलेला अर्थसंकल्प कुचकामी आहे.घोषणा आणि वस्तुस्थिती यामध्ये खूप मोठे अंतर आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत काय?असा घणाघात काँग्रेस च्या खा.रजनीताई अशोकराव पाटील यांनी राज्यसभेत केला.
अर्थसंकल्पात ४% वाढ केल्यामुळे ग्रामीण भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे का ?
गाव हा भारताचा आत्मा आहे गाव विकसित झाले नाहीत तर विकासाचा दावा हा पोकळ आहे.
विकासाचा पाऊल उचलल्याचा सरकार दावा करत असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे.या वाढीव अर्थसंकल्पाने शेतमजूर, शेतकरी,बेरोजगार यांचे प्रश्न सुटणार आहेत काय असा सवाल उपस्थित केला.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून जी रामजी केले मात्र हा कायदा रोजगार उपलब्ध करून देणार आहे काय असा प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या योजनांमध्ये निधीत वाढ होण्याऐवजी कमी होत आहे ही बाब गंभीर असल्याचा निर्वाळा दिला.



