
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव (बु) येथील स्व. रेखा भगवान गोदाम यांच्या स्मृति प्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव धनंजय गोदाम व सून सोनल गोदाम या दांम्पत्याने जिल्हा परिषद शाळा बोरगाव (बु)येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून आईच्या स्मृतींना अभिवादन केले.
स्व.रेखा गोदाम यांनी प्राथमिक शिक्षण याच शाळेत घेतले होते. त्यांच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षांपासून धनंजय व सोनल गोदाम हे दांपत्य मुंबई-खारघर येथून दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या आदर्श उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक,ग्रामस्थ तसेच नातेवाईकांनी गोदाम दांपत्याचे कौतुक केले.
यावेळी बन्सी अप्पा आरकडे,संग्राम आरकडे, विजय आरकडे, भैय्यासाहेब आरकडे, प्रभावती आरकडे, मनिषा आरकडे,स्मिता आरकडे,जयश्री गायकवाड,सरिता आरकडे,जया आरकडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख आर.के.सह शिक्षक यादव बी.एन, जोशी व्ही.बी,सागरे एस. पी,पोपळघट पी.व्ही, कुदळे मॅडम,देखणे मॅडम आदी शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.



