सामाजिक

केज वासियांच्या वतीने आ.नमिता मुंदडा यांचा सत्कार,केज जिल्हा परिषद शाळा पूर्ववत होणार. – आ.नमिता मुंदडा 

केज/प्रतिनिधी

केज वासियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आ.नमिता मुंदडा यांच्या सत्काराचे आयोजन दि.७ मार्च रोजी शनिवारी सकाळी करण्यात आले.यावेळी केज येथील ऐतिहासिक जिल्हापरिषद माध्यमिक शाळेच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शाळेची जागा इतर कोणत्याही संस्थेला किंवा खासगी कामासाठी हस्तांतरित करू दिली जाणार नाही, ही शाळा पुन्हा पूर्वी सारखीच गजबजणार, अशी ग्वाही आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली. या यशस्वी पाठपुराव्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केजच्या नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांनी आ.नमिता मुंदडा यांचा भव्य सत्कार केला.

विधानसभेत घुमला शाळेचा आवाज

गेल्या काही काळापासून जिल्हा परिषद शाळेच्या जागेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.मात्र, आ.नमिता मुंदडा यांनी विधानसभा सभागृहात या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली.शाळेची जागा अन्य कोणत्याही संस्थेला देऊ नये आणि तिथे पुन्हा शैक्षणिक उपक्रम जोमाने सुरू व्हावेत,ही मागणी त्यांनी लावून धरली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कृतज्ञता सोहळा आणि ‘शब्द’ आ.नमिता मुंदडा यांचा शनिवार,दि.७ मार्च रोजी शाळेच्या प्रांगणातच हा भव्य सत्कार सोहळा पार पडला.यावेळीसत्काराला उत्तर देताना आ.नमिता मुंदडा भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की,शाळा हे केवळ इमारत नसून संस्कारांचे मंदिर आहे. केजच्या या ऐतिहासिक शाळेचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य आहे.मी शब्द देते की,ही जागा कोणाच्याही खासगी फायद्यासाठी वापरू दिली जाणार नाही. शाळा पूर्ववत करण्या साठी शेवटच्या श्वासा पर्यंत प्रयत्न करेन.

आमदारांची दोन महत्त्वाची आश्वासने:

१.शैक्षणिक संवर्धन:

शाळेच्या जागेचा वापर केवळ आणि केवळ शैक्षणिक कारणांसाठीच होईल याची कायदेशीर खबरदारी घेतली जाईल.

२.अतिक्रमणांविरुद्ध मोहीम: 

केज शहरातील शासकीय भूखंडांवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कठोर पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक प्रसंगी आंबेजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर काकाजी मुंदडा यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला केज परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने मान्यवर व शाळेचे माजी विद्यार्थी गिरीश भाऊ देशपांडे, सुनील केंद्रे,संजय चौरे सर,हनुमंतराव भोसले सर,डॉ.वासुदेव नेहरकर, प्रवीण देशपांडे.प्रकाश मुंडे,विनोद शिंदे पाटील, पिंटू पाटील,सचिन देशपांडे,समियोदीन इनामदार,विनायक नेहरकर,अॕड.सुंदर तपसे,सचिन नेहरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी व अतिथी मध्ये गटविकास अधिकारी श्री.विठ्ठल नागरगोजे,रहेकवाल सर,बारामतीचे शिंदे पत्रकार,बारामती रोटरीचे अध्यक्ष रविकिरण आणि माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भोसले सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार गिरीश भाऊ देशपांडे यांनी मानले.आ.नमिता मुंदडा यांच्या या भूमिकेचे संपूर्ण केज तालुक्यातून टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहात स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!