सामाजिक

काळाबरोबर अपडेट असणे गरजेचे – डॉ.भागीरथी गिरी

केज/प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवर्ग ‘ड’ पायाभूत उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन सोहळा दि.५/३/२०२६ रोजी साने गुरुजी निवासी प्रा. मा.उच्च माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाच्या समन्वयक व मार्गदर्शिका डॉ.भागीरथी गिरी मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या पायाभूत प्रशिक्षणाची गरज व महत्त्व समजून सांगितले.

त्याचबरोबर या प्रशिक्षणाची उपयुक्तता यावर भर दिला त्यामध्ये त्यांनी सांगितले प्रशिक्षण नाही तर प्रमोशन नाही आणि आपण काम करत असलेल्या पदावर काळा अनुरूप अपडेट असणे गरजेचे आहे जगात होणारे बदल आपल्याला माहित होणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे आपल्या गाडीला आपण नियमित पणे सर्व्हिसिंग करतो त्याचप्रमाणे आपल्या सेवा कालावधीमध्ये प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज चे संस्थापक अध्यक्ष अॕड. उद्धव अण्णा कराड साहेब यांनी उजळणी व पायाभूत प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या कर्मचाऱ्यांना उदाहरणे व दाखले देऊन प्रशिक्षण कशाप्रकारे गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून सांगितले.  प्रशिक्षण म्हणजे आपण करत असलेल्या कामात सुसूत्रता आणणे होय यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे जसे की जगात होणारे बदल आपल्याला माहीत होणे गरजेचे आहे.

सध्या समाजात काळानुरूप अपडेट असणाऱ्यालाच किंमत आहे तेव्हा आपण ड प्रवर्गात असलो तरी आपला काळानुरूप मागील कामाची पद्धत व काळानुरूप बदललेली कामाची पद्धत या दोन्हींना जोडण्यासाठी अपडेट असणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षण सदर प्रशिक्षण हे दिनांक ५ मार्च २०२६ रोजी ते ७ मार्च २०२६ पर्यंत शंभर लोकांचे निवासी स्वरूपाचे आहे.यावेळी उपस्थित असलेल्या संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता कराड मॅडम मंचावर उपस्थित होत्या. या प्रशिक्षणात सुलभक म्हणून डॉ.शशिकांत गिरी,डॉ.कविता कराड मॅडम,डॉ.राठोड, डॉ. मनीषा नागरगोजे,श्रुती लहाने,शितल बोधले, अमीर कच्छी सर हे सुलभक प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रुती लहाने मॅडम तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधिव्याख्याता डॉ.प्रतिभा देशपांडे मॅडम यांनी केले सर्व मान्यवराच्या व प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!