आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बनसारोळा येथील सिध्दार्थ गजानन भोजने यशस्वी

केज/प्रतिनिधी
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या एन.एम.एम.एस.परीक्षेत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बनसारोळा येथील विद्यार्थी चि.सिध्दार्थ गजानन भोजने याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिध्दार्थ भोजने याने कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर ही शिष्यवृत्ती मिळवली असून पुढील शिक्षणासाठी त्याला याचा मोठा लाभ होणार आहे.या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.या यशा बद्दल विद्यार्थ्याचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब काकडे, संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी केले आहे.विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


