सामाजिक
खा.रजनीताई पाटील यांनी घेतली खा.शरद पवार यांची सदिच्छा भेट

केज/प्रतिनिधी
देशाचे नेते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खा.शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी जाऊन काँग्रेसचे नेत्या खा रजनीताई पाटील यांनी मंगळवार रोजी सदिच्छा भेट घेतली.यावेळी भेटी दरम्यान विविधविषयावर चर्चा झाली.महाराष्ट्रातील राजकारण,समाजकारण अशा विषयावर सविस्तर चर्चा झाली.देशातील, महाराष्ट्रातील सामान्य जनता विविध संकटाचा सामना करत आहे. महागाई बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उभे आहेत.विविध योजना लोकांपर्यंत पोहचत नाहीत.विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे यांसह राजकिय विषयावर चर्चा झाली.यावेळी समवेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य दादा पाटील हे उपस्थित होते.



