देवगांव येथील रेणूका देवी यात्रेच गुरुवार पासुन आयोजन, गावातील पालखी मिरवणूकीने यात्रेची होणार सांगता

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगांव येथील रेणुका देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुवार दि.२ एप्रिल पासुन सुरु होत आहे.यामध्ये गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता देवीचा गाढा ओढणे,सोबत पालखी मिरवणुक कार्यक्रम व शुक्रवारी संध्याकाळी (छबिना) गावातील पालखी मिरवणूकीने यात्रेची सांगता होणार असल्याने या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येंने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे सह यात्रा कमेटी सदस्यांनी व गावक-यांनी केली आहे.
केज तालुक्यातील देवगांव येथे गावच्या उत्तर दिशेला दोन किलो मीटर अंतरावर तिर्थक्षेत्र रेणुका माता देवीचे सुंदर मंदिर आहे. गावक-यांचे व पंचक्रोशीतील गावांचे ग्रामदैवत असलेल्या या रेणुका देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महीन्यातील पौर्णीमेच्या दिवशी भरते दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दि.१ एप्रिल बुधवार रोजी गावातील सुवासिनी आपल्या सोयीनुसार देवी मंदीर परिसरात पंगत घालतील.दि.२ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी गावात हनुमान जयंती उत्सव साजरा करुन लगेच सकाळी आठ वाजता रेणुका देवीचा गाढा मंदिराकडे निघेल सोबत देवीची पालखी
देवगांव येथून वाजत गाजत मंदीराकडे मार्गस्थ होणार आहे.हा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशील मंडळी व महीला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.दुस-या दिवशी शुक्रवारी दुपारी चार वाजता रेणुका देवी मंदिर परिसरात महा प्रसादाची मोठी पंगत होणार व त्याच दिवशी संध्याकाळी गावात देवीचा (छबिना) पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.तरी या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येंने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे सह यात्रा कमेटीचे सदस्य व गावक-यांनी केली आहे.



