महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा केज यांच्याकडून पोलिस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल दत्तात्रय बिक्कड यांचा भव्य गौरवपूर्ण सत्कार

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा,केज यांच्या वतीने नाहोली ता. केज येथील भूमिपुत्र दत्तात्रय एकनाथ बिक्कड यांची पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पत्रकार, पोलीस अधिकारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रय बिक्कड यांनी पोलीस दलात तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवा बजावली आहे.ते सध्या सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते.त्यांच्या दीर्घ सेवेला व अनुभवाला मान देत मा.पोलीस अधीक्षक नवनीत काॕवत यांनी वयाचा विचार करून त्यांची पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती केली.या निर्णयाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सत्कार समारंभात त्यांच्या कार्याचा गौरव करताना वक्त्यांनी सांगितले की,दत्तात्रय बिक्कड यांनी आपल्या सेवाकाळात शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध राखले.त्यांच्या बढतीमुळे नाहोली गावासह केजतालुक्याचा सन्मान वाढला आहे.
यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सचिव विजय बिक्कड,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,कार्याध्यक्ष नंदकिशोर मिसाळ, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग कसबे,पत्रकार रणजीत घाडगे,पत्रकार सचिन साखरे,पत्रकार हिराचंद काळे,धनराज लाटे, ओमकेश नेहरकर तसेच सहाय्यक फौजदार वाघमारे,पोलिस उप निरीक्षक सोनवणे, पोलीस हवालदार वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात पुष्पहार व शाल- वृक्ष देऊन दत्तात्रय बिक्कड यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी सर्वांचे आभार मानत पुढील काळातही कर्तव्यनिष्ठपणे सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



