पत्रकार महादेव गायकवाड पत्रकारिता संघर्ष गौरव पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी
दै.रणझुंजारचे केज तालुका प्रतिनिधी महादेव गायकवाड हे पत्रकारिता संघर्ष गौरव पुरस्काराने व इतर मान्यवरही रविवारी सन्मानित झाले.केज शहरातील शिक्षकांची सहकारी पतसंस्था येथे एक मार्च रविवारी सायंकाळी सन्मानित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई, राष्ट्रीय पत्रकार संघ केज,पुरोगामी पत्रकार संघ,सह्याद्री पत्रकार संघाचे सर्व पत्रकार व आयोजक पत्रकार चंद्रकांत पाटील, संपादक अजय भांगे, रंजीत घाडगे,अनील ठोंबरे यांच्यासह पत्रकार बांधवांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.केज शहरातील शिक्षकांची सहकारी पतसंस्था येथे १ मार्च रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई,राष्ट्रीय पत्रकार संघ केज,पुरोगामी पत्रकार संघ तसेच सह्याद्री पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती व महीलांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गुण गौरव पुरस्कार जाहीरकेले होते.
यामध्ये केज नगर पंचायतच्या उत्कृष्ट नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड यांना पुरस्काराने सन्मानित केले तर केज भूषण गौरव पुरस्कार डॉ.हारुणभाई इनामदार, आदर्श डॉक्टर गौरव पुरस्कार डॉ.बालासाहेब अस्वले,अष्टपैलू समाज गौरव पुरस्कार हनुमंत भोसले सर,उत्कृष्ट नगरसेवक गौरवपुरस्कार राजुभाई इनामदार, पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार श्री.धनजंय कुलकर्णी,उत्कृष्ट पत्रकारिता गौरवपुरस्कार संतोष गालफाडे, पत्रकारिता संघर्ष गौरव पुरस्कार महादेव गायकवाड,निर्भीड पत्रकारिता गौरवपुरस्कार गौतम बचुटे,पँथर भूषण गौरव पुरस्कार दिपक कांबळे,क्रीडा प्रशिक्षक गौरव पुरस्कार विनोद गुंड,उत्कृष्ट अभिनेता गौरव पुरस्कार प्रजेनजिन राहुल गायकवाड,उत्कृष्ट अधिपदीचारीका गौरव पुरस्कार ज्योती विलास मस्के-आरकडे,आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रा.धनराज भालेराव, उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार अरविंद थोरात,उत्कृष्ट युवा उद्योजक गौरव पुरस्कार महेश तपसे तसेच समाजसेवक गौरव पुरस्कार वृद्धाश्रमचे महादेव कराड यांना देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संपादक अजय भांगे यांनी केले तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई,
राष्ट्रीय पत्रकार संघ केज,पुरोगामी पत्रकार संघ तसेच सह्याद्री पत्रकार व सर्व संघाच्या पत्रकार बांधवांनी पुरस्कार विजेत्यांना फेटा बांधून एक झाड व ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले.शेवटी या सांस्कृतीक कार्यक्रमात केज तालुक्यातील अनेक प्राथमीक व माध्यमिक गटाच्या मुलामुलीनी सहभागी होऊन आपली कला दाखवून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून डाॅ.हनुंमत सौदागर प्रा.पवन सरवदे,प्रा. विठ्ठल समुद्रे यांनी परिक्षण करुन निकाल जाहीर केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हनुमंत भोसले सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव,नागरीक व महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.



