सामाजिक

वाघे बाभुळगाव शिवारातील दुर्घटना,पत्नीला वाचविताना पतीचाही विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव शिवारात विहिरीतून पाणीकाढताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचाही,पत्नी सह विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

वाघेबाभुळगाव शेजारीच असलेल्या पवारवाडी येथे शेतकरी भास्कर विनायक पवार,पत्नी अलका पवार व मुलगा ऋषिकेश हे तिघे ही वाघे बाभूळगाव शिवारातील शेतात खुरपणी करीत होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान अलका पवार या पिण्या साठी विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्या.त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती भास्कर पवार यांनीही विहिरीत उडी मारून पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र अलका पवार वय 40 वर्षे व भास्कर पवार वय 45 वर्षे या दोघा पती,पत्नीचा ही विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.मयताचा भाऊ सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उप निरीक्षक अशोक सोनवणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!