शैक्षणिकसामाजिक

स्वच्छतेने अनेक आजार दूर होतात

केज/प्रतिनिधी

नगरपंचायत केजच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ आणि माझी वसुंधरा ६.० अनुषंगाने स्वच्छते विषयी केज नगरपंचायतच्या वतीने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शाळा अंतर्गत प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे आयोजित करण्यात आला होता.

या बक्षीस वितरण कार्यक्रमात नगरपंचायतीचे पाणी पुरवठा अभियंता श्री.जगदीश हेंबाडे व शहर समन्वयक श्री.तपसे गोविंद तथा साने गुरुजी निवासी विद्यालय संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता गित्ते – कराड मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत केज नगरपंचायतच्या वतीने स्वच्छते विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की,घरामधील विघटन होणारा कचरा व अविघटन होणारा कचरा अशा प्रकारे वर्गीकरण करून कचरा गोळा करून नगरपंचायतच्या घंटा गाडीतच टाकला पाहिजे.

घरातील व परिसरातील स्वच्छते विषयी सजग राहून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या आजारांच्या समस्या निर्माण होतात रोगराई वाढते असे प्रतिपादन करून या निबंध स्पर्धेत व चित्रकला स्पर्धेत प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!